Devendra Fadnavis : वागळेंची गाडी फोडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना फडणवीसांनी झापलं; म्हणाले...

Pune BJP : 'ज्यांना कुणीच ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करता?'
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर गेल्या आठवड्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ही भाजपचे कल्चर मुळीच नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. 'ज्यांना कुणीच ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करता?' असा प्रश्नही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला.

निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल ट्विट केल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात आलेल्या वागळेंवर हल्ला केला होता. यावर फडणवीस म्हणाले, 'पंतप्रधान मोदी आणि ज्येष्ठ नेते आडवाणी यांच्याबाबत ज्या प्रकारचे शब्द वापरले हे शोभनीय नाही.' उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी संध्याकाळी एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Shivajirao Adhalrao Patil : लोकसभेच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटलांकडे नवी जबाबदारी

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, एका बाजुला चुकीचे भाष्य करायचे आणि दुसरीकडे मोठ्या गोष्टी करायच्या हे योग्य नाही. भाजप कार्यकर्त्यांना माझे नेहमीच सांगणे असते की कायदा हातात घेऊ नका. विनाकारण कुणालाही मोठे करू नका. ज्या लोकांना कोणी ऐकायला येत नाही त्यांना मोठे करू नका, असा टोलाही त्यांनी वागळेंना लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या गाडीवर हल्ला केला. याबाबत फडणवीस असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाही. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे; निश्चितपणे यांची निराशाही त्यामधून पाहायला मिळत आहे. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू. त्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis
Vaibhav Naik : चिपळूणच्या राड्यानंतर कणकवलीतील आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ; नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com