Raghunath Kuchik - Chitra Wagh
Raghunath Kuchik - Chitra Wagh  sarkarnama
पुणे

रघुनाथ कुचिक प्रकरण : वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले, तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप तरुणीने केला असून मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.

संबंधित तरुणीने 'साम टीव्ही'शी बोलताना चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणले, असा पीडितेचा आरोप आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हंटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.

काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सध्या चौकशी आणि तपास सुरु असून राज्य महिला आयोग या तपासावर लक्ष ठेवून आहे. सध्या रघुनाथ कुचिक या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. दुसऱ्या बाजूला चित्रा वाघ या सातत्याने या प्रकरणाच पाठपुरावा करत असून त्या पत्रकार परिषदेच्या माध्य्यमातून कुचिक आणि सरकार-प्रशासन यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र तरुणीच्या या आरोपांमुळे चित्रा वाघ यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT