पिंपरी : बजाज उद्योगसमूह उभा करून हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारे उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) हे अत्यंत साधे व्यक्तीमत्व होते. कंपनीच्या आवारात राहणारे एकमेव उद्योजक होते. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) आकुर्डी येथील बजाज कंपनीच्या आवारात त्यांचे वास्तव्य होते. महापालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ते सर्वसामान्य मतदाराप्रमाणे रांगेत उभे राहून आकुर्डीतील गोदावरी हिंदी शाळेत मतदानाचा हक्क आवर्जून बजावत होते. आता, मात्र, येऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ते गोदावरी शाळेत मतदान करताना दिसणार नाहीत. ही रुखरुख काही स्थानिक मतदार आणि गोदावरी शाळेतील निवडणूक कर्मचाऱ्यांना यावेळी नक्की जाणवणार आहे. (rahul-bajaj-passes-away)
शनिवारी (ता.१२ फेब्रुवारी) निधन झालेल्या राहूल बजाज यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आकुर्डीतील निवासस्थानी रविवारी (ता.१३ फेब्रुवारी) सकाळपासून ठेवण्यात आले होते. तेथेच सर्वच स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कामगारांप्रती त्यांचा मोठा जिव्हाळा होता. त्यातून बजाज कंपनीचे कामगारच, नाही, तर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यावेळी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहीर, स्थानिक खासदार श्रीरंगआप्पा बारणे, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.
राहुल बजाज यांनी 1968 साली बजाज ऑटो मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1965 ते 2008 या कालावधीत तीन कोटींवरून दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा प्रवास या कंपनीने केला. त्यात राहुल बजाज यांचे योगदान अधिक आहे. त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.