साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन

महाराष्ट्राच्या (Maharashtra) साहित्य वर्तुळावर व विदर्भ साहित्य संघावर शोककळा पसरली आहे.
Narendra Lanjewar
Narendra Lanjewarsarkarnama
Published on: 
Updated on: 

बुलडाणा : साहित्य क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते, विविध वृत्तपत्रांचे स्तंभलेखक साहित्यिक, कवी, निवेदक व प्रख्यात सूत्रसंचालक नरेंद्र लांजेवार (Narendra Langewar) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. लांजेवार बुलडाणा (Buldana) येथील भारत विद्यालयामध्ये ग्रंथपाल होते. त्यांनी अनेक साहित्यिकांना प्रेरणा दिली. त्याचे बुलडाणा येथील लद्धड रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

Narendra Lanjewar
विदर्भवादी संतापले; म्हणाले, तुम्ही विदर्भात येऊच नका...

गेल्या ४ महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. साहित्य क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेट घेतली होती. मात्र, आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) साहित्य वर्तुळावर व विदर्भ साहित्य संघावर शोककळा पसरली आहे.

Narendra Lanjewar
'पीए'मुळे बच्चू कडूंना कारावासाची शिक्षा ; गोपाल तिरमारेंमुळे प्रकरण उघडकीस

लांजेवार हे विदर्भ साहित्य संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारी होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता. बुलडाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात एक ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अनेक साहित्यिकांनी त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP Leader : भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले नेते मुख्यमंत्र्यांसोबत; फोटो व्हायरल, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केली होती बंडखोरी
chandrashekhar bawankule, balvant wankhede
Nitin Gadkari on Gokul Milk
Sangita Shinde meets BJP MP Anil Bonde