Rahul Gandhi conviction stayed Pimpri News  Sarkarnama
पुणे

Rahul Gandhi conviction stayed : राहुल गांधींना दिल्लीत मिळालेल्या दिलाशाचा कॉंग्रेसकडून पिंपरीत विजयोत्सव

Modi Surname Defamation Case : निकालानंतर शहर कॉंग्रेसने पिंपरी चौकात विजयोत्सव केला.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिल्याने त्यांना खासदारकी गमवावी लागली होती. सत्र न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने काल (शुक्रवारी) गांधींना सर्वोच्च दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे खासदारकी त्यांना परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसने लगेच सायंकाळी पिंपरी चौकात मोठा जल्लोष केला.फटाके फोडून त्यांनी पेढे वाटले. हा निकाल गांधींसह कॉंग्रेसचा उत्साह वाढविणारा आहे. तर, सत्ताधारी भाजपला तो चपराक समजला जात आहे. राहुल गांधींचा नव्हे, जनतेचा आणि सत्याचा हा विजय असल्याचे सांगत आज नाही तर उद्या, उद्या नव्हे तर परवा, विजय सत्याचाच होतो,अशी प्रतिक्रिया गांधींनी या निकालावर दिली आहे.

हा भारतीय संविधानाचा व सत्याचा विजय असल्याचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले. सुडबुध्दीच्या राजकारणातून भाजपने ही खोटी केस दाखल केली होती, असे ते म्हणाले. दरम्यान या निकालानंतर शहर कॉंग्रेसने पिंपरी चौकात विजयोत्सव केला. फटाके फोडले.पेढे वाटले. ज्येष्ठ नेते मानव कांबळे, महिला अध्यक्षा सायली नढे,वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे आदी या आनंदोत्सवात सामील झाले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT