Pune Tribal Student Protest .jpg Sarkarnama
पुणे

Pune Trible Protest: राहुल गांधींनी घातलं लक्ष, फडणवीसांनी वेगाने चक्रे फिरवली, आदिवासी विद्यार्थ्यांच्या 17 दिवसांच्या लढ्याला मोठं यश; उपोषण मागे

Pune News: गेल्या 17 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पुकारले होते. मात्र, सलग अन्नत्याग केल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमातून या आंदोलनाची तीव्रता पुढे आली.

Deepak Kulkarni

Pune News: पुण्यातील मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी उभारलेल्या लढ्याला अखेर मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यानंतर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत राज्य सरकारने त्यांच्या मान्य केल्याची घोषणा केली. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

पुण्यातील मांजरी स्टड फार्म परिसरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या 17 दिवसांपासून विविध मूलभूत हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. आता हे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात राज्य सरकारला अखेर मोठं यश आलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या दखलमुळे या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली होती. तसेच गांधी हे पुन्हा एकदा आंदोलनस्थळी भेट देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सरकारने वेगानं सूत्रे फिरवली.

आंदोलक विद्यार्थ्यांनी जोपर्यंत लेखी आश्वासन आणि शासनादेश (जीआर) हाती मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची ठाम भूमिका घेतली होती. तसेच प्रवासाचा मंत्री महोदय आणि शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सरकारी जीआर सादर करेल, त्यानंतरच आंदोलनाच्या मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते शनिवारी (ता.29) या आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी उपोषण जरी सोडले असले, तरी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. रात्री उशिरा मंत्री अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

गेल्या 17 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पुकारले होते. मात्र, सलग अन्नत्याग केल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमातून या आंदोलनाची तीव्रता पुढे आली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांना या आंदोलनाची दखल घेण्याबाबत ट्विटही केले होते. यानंतर सरकारवरचा दबाव वाढत गेला. अखेर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या 14 ते 17 प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली व सरकारने त्या मान्य केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT