BJP MLA : भाजपच्या चार आमदारांसह माजी खासदार अन्‌ माजी मंत्र्याची कोर्टात हजेरी : महत्वाचे कारण आले पुढे

Maratha Kranti Morcha : सोलापूरमधील 2021 च्या मराठा क्रांती मोर्चाप्रकरणी दाखल गुन्ह्यातील 30 संशयितांनी न्यायालयात हजेरी लावली. यामध्ये चार आमदार, माजी मंत्री आणि माजी खासदाराचा समावेश आहे.
Samadhan Autade-Sachin Kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Rajendra Raut
Samadhan Autade-Sachin Kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 August : सोलापूर प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर आज (ता. २९ ऑगस्ट) जिल्ह्यातील चार आमदार, एक माजी मंत्री आणि माजी खासदारासह तब्बल ३० संशयितांनी हजेरी लावली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाप्रकरणी एकूण ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील ३० संशयितांनी आज न्यायालयात हजेरी लावली.

न्यायालयात हजेरी लावणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्णमराव ढोबळे यांचा समावेश आहे. यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने मराठा क्रांती मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी ४ जुलै २०२१ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फौजदार सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती.

Samadhan Autade-Sachin Kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Rajendra Raut
Babasaheb Patil Madha Tour : माढ्यात मराठा आंदोलक सहकार मंत्र्याच्या गाडीखाली घुसला; गाडी अडविण्याचा प्रयत्न

या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर न्यायालयाकडून संशयित आरोपींना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत यांच्यासह इतर संशयित आरोपी शनिवारी न्यायालयात हजर झाले होते.

Samadhan Autade-Sachin Kalyanshetti-Vijaykumar Deshmukh-Rajendra Raut
Satara Politic's : शंभूराज देसाईंनी अखेर ठेवणीतला डाव टाकला; ZPपासून जिल्हा बॅंकेपर्यंतचा सर्व हिशेब चुकता होणार...

संशयितांच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सचिन साखरे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राज म्हात्रे आणि ॲड. अजिंक्य जाधव यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. संतोष पाटील यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com