Pune News : नीट पेपर लीक प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेस "छात्रों की गुंज" अभियान सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या अभियानातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्यांच्या या संवादाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता राहुल गांधीचा आवाज पुण्यात घुमणार आहे.
येत्या शनिवारी (ता.22) पुणे शहरात "छात्रों की गुंज" चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींचे विश्वासू केंद्रीय निरीक्षक के. बी. बैजू यांनी काँग्रेस नेत्यांसोबत ज्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे त्या पाहणी केली.
पुण्यातील शिवाजीनगरमधील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री यशोमती ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.
या अभियानासाठी युवक काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या व या अभियानाची विस्तृत माहिती दिली.
राहुल गांधी पुण्यात होणाऱ्या "छात्रों की गुंज"मध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यीनींना केले आहे. त्यांनी म्हटले की, देशातील मुलींना काय हवे आहे? समानता, सुरक्षा, संधी आणि स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य. आणि त्यांना मिळाले का? असुरक्षितता, भेदभाव आणि आपल्या अधिकाऱ्यांसाठी वाट पाहणे. आता अजुनही पुण्यातील छात्रो की गुंज आंदोलनात सहभागी व्हा. नोंदणी करा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.