Udayanraje Bhosale, Amitesh Kumar, Rahul Solapurkar Sarkarnama
पुणे

Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर क्लिन चीट प्रकरण; उदयनराजे संतापले, म्हणाले, "पुण्याच्या पोलिस आयुक्तांचं डोकं..."

Udayanraje On Rahul Solapurkar clean chit controversy : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर सबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune News, 19 Feb : अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर सबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली.

मात्र, अद्याप त्यांच्यावर या वक्तव्याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याबाबत पुणे (Pune) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारलं असता त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामध्ये कोणतीही अशी गोष्ट आढळली नाही. ज्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिलं आहे.

पोलिस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खासदार छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी आता संताप व्यक्त केला आहे. यावर बोलताना, पोलिस आयुक्तांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल देखील केला आहे. शिवजयंती कार्यक्रमानिमित्त आज उदयनराजे यांनी पुण्यामध्ये उपस्थिती लावली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) दिलेले विचार आजही आपण आचरणात आणतो. आज जी लोकशाही आपण आचरणात आणत आहोत. त्या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे."

छत्रपती शिवाजी महाराजांना 395 वर्ष उलटल्यानंतर देखील त्यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. कारण इतर जी राजघराणी होती त्यांनी स्वतःचं स्वराज्य वाढवण्यासाठी लढा दिला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या साठी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे.

मात्र, त्यात त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, आज अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी वापरला गेल्यास ते अधिक योग्य ठरणार आहे. यामुळे गडकिल्ल्यांच्या पर्यटन देखील वाढेल आणि त्यातून स्थानिकांना रोजगार देखील मिळेल, असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरांना क्लीन चीट दिली आहे. यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, पोलिस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलं नाही. मात्र असं जर कोणी म्हणत असेल तर त्याने स्वतःच्या डोक्याचं चेक अप करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे क्लीन चीट कशी दिली जाऊ शकते कमाल आहे. अशा शब्दात उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT