Chhaava : जरांगे पाटलांनी टायमिंग साधलं! शिवजयंती दिवशीच 'छावा' सिनेमाबाबत सरकारकडे केली मोठी मागणी

Manoj Jarange Patil on Chhaava : अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित असलेला 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.
Manoj Jarange Patil on Chhaava
Manoj Jarange Patil on ChhaavaSarkarnama
Published on
Updated on

Shiv Jayanti 2025 : अभिनेता विकी कौशलचा 'छावा' (Chhaava) सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित असलेला 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.

अशातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिवजयंतीच्या दिवशीच या सिनेमाबाबात सरकारकडे मोठी मागणी केली आहे. आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील या महोत्सवाला हजेरी लावली आहे. तर तिकडे धाराशिव जिल्ह्यात देखील शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

जिल्ह्यातील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत. भगवा ध्वज फडकावत या उत्सवाची मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी 'छावा' सिनेमाबाबत मोठी मागणी केली.

छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. तर यावेळी त्यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारवर मोठा आरोप केला. सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, मात्र त्यानंतर सरकारच्या आदेशामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com