Malin landslide Sarkarnama
पुणे

What Happened in Malin : माळीणमधल्या घटनेची ती रात्र डोळ्यांपुढे आली...

Malin landslide : सहा दिवसात सुमारे 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Pune : गुरुवारची पहाट उगवली ती इर्शाळवाडीतील दरड कोसल्याच्या घटनेनं..,बुधवारी मध्यरात्री अंधारात दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे यापूर्वी झालेल्या माळीण आणि तळीये येथील दुर्घटनची आठवण झाली.

या आठवणी माळीण वासियांना आजही वेदना होतात. "आमच्यावर जी वेळ आली ती कुणावरच नको," अशी भावना माळीणवासींनी व्यक्त केली होती. ही जखम भळभळती असताना इर्शाळवाडीतील या घटनेनं महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

माळीण : 30 जुलै 2014

आठ वर्षांपूर्वीच्या मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आठवण झाली. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात माळीण गावाचं काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं होतं. माळीण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 44 घरं गाडली गेली होती. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नऊशे पेक्षा जास्त मुक्या जनावरांचाही यात मृत्यू झाला होता. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात सुमारे 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले..

30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी माळीण गावाजवळील डोंगराचा कडा खाली आला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाचे त्यांचे अंत्यविधी केले होते.

तळीये : 22 जुलै 2021

अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये गावात 22 जुलै 2021 रोजी घडली होती. तळीये डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावात दुपारी दुपारी साडेचार वाजता कोसळलेल्या दरडीमुळे गावचं उद्ध्वस्त झालं होतं.यात ३५ घरं गाडली गेली होती. तळीयेमध्येही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होता. समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. त्यामुळे गावातील लोक घराबाहेर आले आणि ते दुसऱ्या डोंगराच्या बाजूला आडोशाला उभे राहिले.

जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले..

अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगड पडले, झाडे पडली. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. इथल्या ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले, उरलेले सर्व दरडीखाली दबले गेले.

जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे राहिले, त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. डोंगर कोसळून गाव गाडल्याची माळीणची ही घटना राज्यातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT