पुणे : पुण्यात काल रात्री नऊ वाजल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने एकच हाहाकार माजला. मुसळधार पावसाने पुणेकरांच्या आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सलग पडणाऱ्या मुसाळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. फक्त १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरभरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
२०२० या वर्षाननंतर २४ तास एवढ्या कालावधीत १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ होती. तरी रात्रभर अवघ्या १२ तासांमध्ये कदाचित ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना असावी, असे सांगण्यात येते. पुण्यातील शिवाजीनगर येथे स्थित भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. अनुपम कश्यापी यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, "माझ्या पाहण्यातील तरी एवढ्या कमी कालावधीतला ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे."
दिवसभर आकाश अंशतः ढगाळ अशी स्थिती आणि दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणखी दोन दिवस अशी स्थिती कायम राहणार असल्याचे, समजतेआहे. यामुळे पुढील दोन दिवसकामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसाची शक्यता गृहीत धरूनच बाहेर पडावे. रेनकोट - छत्री तर सोबत बाळगावी, पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या दिनक्रमाचे नियोजन करावे.
ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस :
पुणे शहराचा पावसाचा इतिहास पाहता, दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये ऑक्टोबरमध्ये १४४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये म्हणजे २०१६पर्यंत एकदाही ऑक्टोबर महिन्यात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही. पण यामध्ये २०१८ चा अपवाद वगळता दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हवामान खात्यात नोंदवला गेला
२०१९ मध्ये २३५ मिलीमीटर आणि २०२० मध्ये ३१२ मिलीमीटर पाऊस या एका महिन्यात पडला. या महिन्यातील १४ दिवसांमध्ये १५२.७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे शहरात सातत्याने ऑक्टोबरमधील पाऊस वाढत असल्याचा निष्कर्ष हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून निघात आहे. २०२०, २०१७ आणि २०११ मध्ये एका दिवसात १०० मिलिमीटरपेक्षाअधिक पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील पावसाची नोंद :
(२४ तासांमध्ये पडलेला पाऊस मिलिमिटरमध्ये) :
२०२२ : १५ ऑक्टोबर : ७४
२०२१ : १० ऑक्टोबर : ५५.३
२०२० : १५ ऑक्टोबर : ११२.१
२०१९ : ५ ऑक्टोबर : ४३.८
२०१८ : २ ऑक्टोबर : १६
२०१७ : १४ ऑक्टोबर : १०१.३
२०१६ : २ ऑक्टोबर : ३१.६
२०१५ : १२ ऑक्टोबर : २९.३
२०१४ : २ ऑक्टोबर : ८.१
२०१३ : १६ ऑक्टोबर : १६.१
२०१२ : २ ऑक्टोबर : ३७.७
२०११ : १२ ऑक्टोबर : १०५.१
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.