Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray On Maharashtra : सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही; मोजके बोलून राज ठाकरेंनी भाजपला इशारा

Maharashtra Government : फोडाफोडीच्या राजकारणावर ठाकरेंची टीका

सरकारनामा ब्यूरो

Pune News : आपल्या सभांना गर्दी होते मात्र मते मिळत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ११ आमदार निवडून आले त्यावेळी जादू झाली होती का, असे सडेतोड उत्तर दिले. सत्तेचा कुणी अमरपट्टा घेऊन आलेले नाही. प्रत्येकाची वेळ यावी लागते, असे मोजके बोलूनच ठाकरेंनी राज्यात आपलेही 'राज' येणार असल्याचे सूचक वक्तव्य करत भाजपला टोला लगावला आहे. (Latest Political News)

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर यापूर्वी राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. यानंतर ते पिंपरी चिंडवड येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडखोरीवर समाजातील सुज्ञ लोकांना राग यायला हवा होता, असे ठाकरे म्हणाले. "सत्तेसाठी कुणीही कितीही प्रयत्न केले तरी ती काही कायम राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. सत्ता येते त्या दिवशी ती जायला लागते, फक्त ती टिकवावी कशी एवढेच तुमच्या हातात असते," असे म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचे कानही टोचले.

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते; पण निवडणुकीत मनसेला मते मिळत नाहीत, अशी कायम चर्चा असते. यावर राज म्हणाले, "आपले ११ आमदार कसे निवडूण आले होते? त्यासाठी कुणी आकडे लावले होते का? बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्याही सभांना प्रचंड गर्दी व्हायची, पण मतदान होत नव्हते", याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी "प्रत्येकाची वेळ यावी लागते" असेही सूचक वक्तव्य केले आहे.

महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असलेले राज ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकारितेवरून हल्लाबोल केला. "देशात १९७७च्या आणाबाणीत असलेली बंधने सध्या पत्रकारितेवर पुन्हा लादले आहेत," अशी टीका ठाकरेंनी केली. ठाकरेंच्या निशाणामुळे भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असून ते राज ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhuma)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT