Raj Thackeray On Narendra Modi : राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले; आणीबाणीनंतर आज पुन्हा पत्रकारितेवर बंधने

Raj Thackeray In PCMC : सत्ता येते त्याच दिवशी जायला लागते, ती कशी टिकवता हेच महत्वाचे असते
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Pune News : भारतीय जनता पक्षाने उभारलेल्या महायुतीत मनसेचे स्थान राहणार असल्याची चर्चा रंगत असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. कर्नाटकातील निकाल, महाराष्ट्रातील आमदारांची पळवापळवी, त्यानंतर खड्डे, टोल वसूलीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना चिमटे काढणाऱ्या राज यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पत्रकारितेवर बंधने आल्याचे पटवून देताना राज यांनी नकळतपणे का होईना मोदींवर हल्ला केला. यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असलेले 'मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकारितेवरून हल्लाबोल केला. देशात १९७७च्या आणाबाणीत असलेली बंधने सध्या पत्रकारितेवर पुन्हा लादल्याची टीका ठाकरेंनी केली. ठाकरेंच्या निशाणामुळे भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असून ते राज ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष आहे.

Raj Thackeray
Bachchu Kadu News : बच्चूभाऊंचा संयम संपला; शिंदे-फडणवीसांच्या उमेदवारांविरोधातच फुंकणार रणशिंग ?

देशातील पत्रकारितेचा विचार करता महाराष्ट्रात ती जिवंत असल्याचे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांवरील हल्ले हे चुकीचे व निषेधार्थ असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांवर हल्ले का होतात, याचाही विचार व्हावा, असे ते म्हणाले. खोट्या बातम्यांतून हे हल्ले होताच असे सूचित करून अशा बातम्या थांबविण्याचा सल्लाही राज यांनी दिला.

Raj Thackeray
Sharad Pawar Kolhapur Sabha : पवारांच्या कोल्हापुरातील सभेचे अध्यक्ष शाहू महाराज म्हणाले, ‘खासदार व्हावं, अशी माझी पूर्वी इच्छा होती’

पूर्वी दूरदर्शनवर 'ब्रेकिंग न्यूज' यायची, तेव्हा पोटात गोळा यायचा, अशी आठवण सांगताना ठाकरे म्हणाले, "आता खोट्या बातम्या आणि नेत्यांचे वाह्यात बोलणे आता दाखविणे बंद करून चांगल्या बातम्या दाखवा. अजित पवार सत्तेत गेले, याचा पत्रकारांना राग यायला पाहिजे होता. पंतप्रधानांनी त्यांच्यावर ७० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. यानंतर सहा दिवसांतच ते सत्तेत गेले. महाराष्ट्रात गे काय चालू आहे?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com