Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

Akshay Sabale

MNS News :पुण्यात धरणातून पाणी सोडताना नागरिकांना सूचना द्यायला हवी होती. पण, एवढ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येईल, याची जनतेला कल्पना नव्हती. त्यात मुळा-मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्या अनधिकृत बांधकामांमुळे पुराचे पाणी घरात घुसले.

न सांगता पाणी सोडल्यानं नागरिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं नागरिकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडता येत नाही, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं आहे. टाऊन प्लॅनिंग, महापालिका निवडणूक आणि विविध प्रश्नांवरून मोदीसह शिंदे सरकावर राज ठाकरेंनी टीका केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, "मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला. पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. त्यातेच हे चित्र आहे. राज्य सरकारकडून विकासासाठी प्लॅन येतो. पण, टाऊन प्लॅनची गोष्ट नसते. कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग राबवलं जात नाही. दिसली जमीन की विक एवढा एकचा उद्योग सध्या सुरू आहे. सरकारमधील काहीजण आणि बिल्डरांच्या संबंधांमुळे ही शहरे बर्बाद होत जातील."

"पुणे एक शहर राहिलं नाही, तर पाच-पाच शहरे झाली आहेत. कुठपर्यंत शहर पसरत आहे, याला मर्यादा नाही. गेले दोन-तीन वर्षे केंद्र सरकार महापालिका निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाला कोण बोलणार? प्रशासकीय कारभार चालू असताना, पुराची जबाबदारी सुद्धा प्रशासनाची आहे," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"राज्यात बाहेरून येणाऱ्यांना सरकार फुकट घरे देत आहे. राज्यातील राहणारी लोक भिका मागत आहेत. याला सरकार चालवणे म्हणतात का?" अशी संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

"प्रत्येकजण आपल्या-आपल्या राज्याचा विचार करतोय. महाराष्ट्राचा कुणी विचार करणार आहे की नाही?" असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT