Pune News : पुण्यातील नियोजनशून्यतेमुळे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झाले आहे. साबरमती नदीकाठचा प्रकल्प गुजरातमधील आर्किटेकच्या माध्यमातून पुण्यात कॉपी-पेस्ट करण्यात आला आणि पुणे उद्ध्वस्त केले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली आहे.
गेल्या आठवड्यात पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं. यात अतिवृष्टी आणि मुळा-मुठा नदीत आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर आले. यावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, "पुण्यातील नियोजनशून्यतेमुळे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झाले आहे. साबरमती नदीकाठचा प्रकल्प गुजरातमधील आर्किटेकच्या माध्यमातून पुण्यात कॉपी-पेस्ट करण्यात आला आणि पुणे उद्ध्वस्त केले."
"पुण्यातील नदीचा प्रवाह लक्षात न घेता हा प्रकल्प आखण्यात आल्यानं हा पूर आला आहे. पुण्यातील नदीकाठचा प्रकल्प हा आंधळेपणानं तयार केलेला आहे. पर्यावरणमंत्री असताना मी हा प्रकल्प थांबवून पुन्हा संपूर्ण आखणी करण्यास सांगितली होती. पण, आमचे सरकार पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिका आणि मिंधे सरकार या प्रकल्पाला पाठिंबा देत आहे," असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
"पुण्यातील अनेक शहर विकासकांनी आणि आर्किटेक्टसह मी देखील याविरोधात आवाज उठवला आहे. हा प्रकल्प पुण्यासाठी अडचणीच निर्माण करणार आहे. यंदाच्या पुराच्या माध्यमातून आपण त्याचे परिणाण पाहिलेच आहेत. नदीकाठची बांधकामे तातडीनं थांबविली गेली पाहिजे. नद्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे. पण, मुरूम नद्यांमध्ये टाकून त्या नदीचे काँक्रीटीकरण किंवा काँक्रीकचे डबके बनवायचे नाही," अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.