Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Raj Thackeray News, Vasant More News, MNS News Sarkarnama
पुणे

राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिली मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसेचे (MNS) माजी पुणे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्यावर थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. आज (ता.22 ऑगस्ट) मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. (Raj Thackeray News, Vasant More News, MNS News)

मशिदीवरील बेकायदा भोंगे खाली उतरविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केल्याने वसंत मोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्यावर मनसे पुणे शहाराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र त्यावेळी नेमकं याच प्रकरणावरून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी ठाकरेंनी दिली होती. यावेळी ते पक्षाचा राजीनामा देतील, अशीही जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता पक्षप्रमुखांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर दिली असून त्यांची निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.

मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत. यामध्ये किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांना मावळ लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांनी शिरूर लोकसभा तसेच याबरोबर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामाध्यमातून वसंत मोरेंना खुश करण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला दिसतोय. मात्र मोरे हे आधीसारखे पक्षासाठी झोकून काम करतील का याकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT