Shahaji Patil, ajit pawar Latest News
Shahaji Patil, ajit pawar Latest Newssarkarnama

..मग अजितदादांनी दिलेला निधी गेला कुठे?; शहाजीबापूंना मिटकरींचा सवाल

Amol Mitkari : त्यांनी स्वर्गासारखा विकास केला तो असा का?

Amol Mitkari : गेल्या ४५ दिवसात शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचे डायलॅाग गाजले. मात्र त्यांच्या मतदार संघात काय काय ओके आहे ते सांगायला मी आलोय. ते आरोप करतात की, अजितदादांनी (Ajit Pawar) त्यांना निधी दिला नाही. मात्र त्यांनी किती निधी दिला हे स्पष्ट केलं आहे. मग दिलेला निधी गेला कुठे? कुठे भ्रष्टाचार झाला? याबाबत आपण लवकरच लक्षवेधी मांडणार आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केलं आहे.

Shahaji Patil, ajit pawar Latest News
Nitesh Rane : नितेश राणेंनी वरूण सरदेसाईंचं नाव घेताच सभागृहात झाला गदारोळ..

अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटलांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, त्यांच्या सांगोला गावातील रस्ते आणि इतर विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यांनी स्वर्गासारखा विकास केला तो असा का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. ते नेहमी आरोप करतात की अजितदादांनी त्यांना निधी दिला नाही. मात्र, त्यांनी किती निधी दिला हे स्पष्ट केला हे सांगितले आहे. यामुले दिलेला निधी गेला कुठे गेला याबाबच आपण सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यांचे खोके आणि आल्यानंतर ओके याबाबत आपण लवकरच स्पष्टपणे बोलणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच याबाबत आम्ही महाराष्ट्रात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. कालच दलित अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्याची तक्रारही घेतली जात नाही. याबाबतही तक्रार आपण अध्यक्षांकडे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Shahaji Patil, ajit pawar Latest News
Beed : अपघाताची सीआयडी चौकशी होणार असल्याने ज्योती मेटेंनी मानले सरकारचे आभार

दरम्यान, अफझल खान वध देखावा दाखवण्याच्या परवानगी बद्दल बोलतांना ते म्हणाले की, या प्रसंगाने जर दोन धर्मात तेढ निर्माण होत असेल तर प्रशासनाने त्याची नोंद घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता कोथळा बाहेर काढला असे नाही तर महाराजांनी चांगला विकासही केला आहे. धरण बांधली, गोरगरीब जनतेला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं हेही दाखवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com