Raj Thackeray Sarkarnama
पुणे

MNS : लोकसभा निवडणुकीसाठी 'मनसे'ने कसली कंबर; राज ठाकरेंच्या बैठकीनंतर जागांचा आकडा आला समोर!

Chaitanya Machale

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना काय रणनीती असावी, यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक सोमवारी झाली. मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीमध्ये दक्षिण मुंबई ते कोल्हापूरपर्यंतच्या सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अधिकाधिक जागा लढवून त्यामध्ये यश कसे मिळविता येईल, याबाबत चर्चा झाली.

''महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही महिन्यापासून चांगलेच ढवळून निघाले आहे. आज एकमेकाच्या विरोधात बोलणारा पक्ष दुसऱ्या दिवशी वेगळीच भूमिका घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर एकाच पक्षामध्ये मतभेद होऊन दोन गट तयार होऊन एकाच पक्षाचे पदाधिकारी विरोधी पक्षातील आमदारांच्या खासदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''राजकीय पक्षांनी चालविल्या खेळामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात राजकारणाबद्दल राग निर्माण होत आहे. सध्या सुरू असलेल्या या गलिच्छ राजकारणामध्ये मनसेला आपली विश्वासार्हता निर्माण करण्याची मोठी संधी आहे. याचा फायदा घेत पक्षाच्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील माणसापर्यंत जाऊन पक्ष पोहचविला पाहिजे.'' अशी अपेक्षा या बैठकीत राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी व्यक्त केली.

याचबरोबर ''आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मनसे(MNS) 20 ते 25 जागा लढण्याच्या मनस्थितीत आहे. त्यासाठी आतापासूनच योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या पुणे शहर, मावळ, शिरूर, बारामती, या चार जागा असून त्यासाठी प्रयत्नशील रहावे. पक्षाने आतापर्यंत केलेले काम नागरिकांना सांगावे. त्यांना आपली भूमिका पटवून द्यावी.'' असेही राज ठाकरे म्हणाले.

याशिवाय ''पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीसाठी काय केले पाहिजे, याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. शहरातील मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी याला दुजोरा दिला. सध्याची परिस्थिती मनसेसाठी चांगली असल्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT