Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray: पुण्यात पाच मतदारसंघात 'मनसे' भिडणार!

MNS Announced List of Candidates: ठाणे शहरातील चारही मतदार संघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा - माजिवडा आणि कळवा- मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Pune : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असतानाच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. महायुतीत सहभागी न होता मनसे स्वबळावर लढणार आहे. राज्यातील जवळपास 225 ते 250 जागा मनसे लढवणार आहे.

पुण्यातील आठ मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देणार आहे. त्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर मनसे आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

येत्या रविवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे समजते.

पुण्यात (ता. 7 ऑक्टोबर) पुण्यातील संकल्प मंगल कार्यालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे नेते शिरीष सावंत,अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वगासकर, सरचिटणीस बाळा शेडगे, किशोर शिंदे, अजय शिंदे आदी ग्रामीण आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरातील चारही मतदार संघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा - माजिवडा आणि कळवा- मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अभिजित पानसे, आमदार संजय केळकर यांच्याविरोधात अविनाश जाधव,आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात संदीप पाचंगे किंवा पुष्कर विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सुशांत सूर्यराव हे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे.

मनसे संभाव्य उमेदवार

नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT