Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray News : राज ठाकरेंचे श्वान प्रेम पुन्हा एकदा आले समोर ; उद्घाटन करताच...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नुकताचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या सभेतून त्यांनी राजकारणातल्या विविध मुद्द्यावर जोरदार भाष्य केले. गुढीपाडवा मेळाव्यानंतर आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांचे श्वान प्रेम दिसून आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. पुण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येथे सुरू झालेल्या केंद्राचा आढावा घेतला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं श्वानावरील प्रेम हे सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीची श्वान आहे. पण त्यांचा लाडका होता तो ग्रेट डेन ( james dog) प्रजातीचे "जेम्स" नावाचा श्वान राज ठाकरे यांच्याकडे होते, मात्र जून २०२१ मध्ये त्याचे निधन झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT