Kirit Somaiya news:  Sarkarnama
पुणे

Kirit Somaiya News : जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; साळुंखेंना अटक,आता सोमय्यांची 'ही' नवीन मागणी

ShivajiNagar Jumbo Covid Center scam: आघाडी सरकारच्या काळात शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

Pune News: भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा उघडकीस आणला होता. आता या गैरव्यवहारप्रकरणी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजीव साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. साळुंखे यांच्या अटकेची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन दिली होती. आता सोमय्यांनी सुजीत पाटकर यांच्या अटकेची मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi)च्या काळात पुण्यातील शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांशी जवळचे संबंध असल्यानेच एका चहावाल्याला या कोविड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिला असल्याचंही आरोपही केला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. साळुंखे हे पाटकर यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. आणि पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी आधीच गुन्हा...

शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. डॉ. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिके(PMC)ने तसेच पीएमआरडीएने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार ही केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut)चे पार्टनर,सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे. आता सोमय्यांनी डॉ हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजित पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT