Pune Cyber Crime News
Pune Cyber Crime News Sarkarnama

Pune Crime News: बापरे! सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केलं टार्गेट; बनावट फेसबुक अकाउंट बनवत...

Cyber Crime News : सायबर चोरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Pune News : राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच आपल्या कानावर येत असतात. बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, आता सायबर चोरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या नावानेच बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिली आहे.

Pune Cyber Crime News
BRS News: महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी केसीआर यांचा मोठा प्लॅन; चिरंजीव अन् जावयांवर सोपवली 'ही' जबाबदारी

सायबर (Cyber Crime ) चोरट्यांनी 'माही वर्मा' या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील काहींना रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या होत्या. सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Pune Cyber Crime News
Prakash Ambedkar News: ''पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना उल्लू बनविणारा नेता अजित पवार..'' आंबेडकरांचं मोठं विधान

दरम्यान, डॉ.राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधीही दोन वेळा अज्ञातांनी फेसबुक अकाऊंट तयार केलं होतं. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन डॉ.राजेश देशमुख यांनी नागरिकांनी केले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com