Pune News : राज्यातील कारागृहामध्ये सन 2023 ते 2026 या वर्षांमध्ये रेशन कॅन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. यामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभागा असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात असलेले त्यांनी याबाबत चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्यातील कारागृहामध्ये कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते. रेशन व कॅन्टीनमधून कारागृहातील कैद्यांसाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ साखर डाळी दूध फळे भाजीपाला कांदा बटाटा, चिकन मटण अंडी बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात.
राज्य सरकारच्या कारागृह विभागाने सेंट्रलाईज पध्दतीने निविदा प्रक्रिया करून राज्यातील सर्व काराग्रहांना रेशन व कॅन्टीन मधील साहित्याची खरेदी करत असते. सेंट्रलाईज पध्दतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढविलेले असून मंत्रालयीन व इतर उपहारग्रहामध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानंचा फरक आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
याचपद्धतीने विद्युत उपकरणांसह अन्य कारागृहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते. या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून यामध्ये अधिकारी यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच सदरची खरेदी होत असताना गुणवत्तापूर्ण व उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत मुदतबाह्य निकृष्ठ सुमार दर्जाचे बुरशीजन्य माल पुरवठा केला असल्याचे काराग्रह अधीक्षकांनी व कारागृहातील कैद्यांनी वेळोवेळी लेखी स्वरुपात कळविल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
कारागृहामध्ये रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू तांदूळ साखर, मीठ,पोहे,गुळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो 11 रुपयांपासून ते 30 रुपायापर्यंत जादा दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, चहा पावडर यासारख्या वस्तूमध्ये बाजारभावापेक्षा प्रतिकिलो 110 रुपये ते 250 रूपये प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात आले आहेत.
कारागृहामध्ये रेशन व कॅन्टीन साहित्याबरोबरच जनरेटर, वाशिंग मशिन ड्रोन कॅमेरा प्रिंटर कुलर मामधील खरेदी दरात मोठी तफावत दिसून आली आहे. यापद्धतीने अधिकारी व काही ठेकेदार मिळून कारागृहात दरवर्षी करोडो रुपयाचा चुराडा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही राज्य सरकार अथवा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे कारागृहातील अधिकारी माजलेले अजून हप्ते खालपासून वरपर्यंत पोहचवित असल्याने आमचे कुणीच वाकडे करू शकत नाही या अविर्भावात वावरू लागले आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
दिवाळीमध्ये खरेदी केलेल्या फराळाचे दर तर गगनाला भिडणारे व बाजारातील नावाजलेले कंपन्यांचे होते. मात्र, कैद्यांना स्थानिक बाजारातील निकृष्ठ दर्जाचे लाडू, चिवडा व इतर फराळाचे साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील अनेक काराग्रहात अन्न भेसळ विभागाने धाडी टाकल्या यामध्ये रेशन व उपहारगृहातील निकृष्ठ दर्जाच्या मालाचे नमुने अहवाल सादर केले. तरीही यामध्ये कारागृहास माल पुरवठा करणा-या ठेकेदाकडून कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही, असे देखील शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी पुढे म्हणाले, काराग्रहात कैद्यांना दिले जाणारे जेवण व उपहार गृहातील साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे व भेसळ असते याचा मी येरवडा कारागृहात कैदी म्हणून असताना प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. पाणचट यहा कच्चा चपात्या न शिजवता दिला जाणारा भात चटणी व मौठ नसलेल्या भाज्या व आमटी. बुरशीजन्य बेकरी पदार्थ कैद्यांना दिले जात होते. याबाबत राजू शेट्टी यांनी संबंधित काराग्रह अप्पर पोलिस महासंचालक यांना लेखी तक्रार करुनसुद्धा संबधित भ्रष्ट लोकांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.