Raj Thackeray: जोशीबुवा, मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे लक्षात ठेवा! राज ठाकरे संतापले

Bhaiyyaji Joshi Marathi Language Controversy : काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान...
Raj Thackeray Angry on Bhaiyyaji Joshi
Raj Thackeray Angry on Bhaiyyaji JoshiSarkarnama
Published on
Updated on

विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी मुंबई येऊन मराठी भाषेविषयी केलेल्या धक्कादायक विधानामुळे राजकारण पेटलं आहे. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे पडसाद राज्याच्या अर्थंसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात उमटले. सत्ताधारी-विरोधकांमध्ये यावरुन जुंपली.

मराठी भाषा, मराठी अस्मिता, हा प्रमुख मुद्दा असलेल्या मनसेनं यात उडी घेतली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरुन भैय्याजी जोशी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. "महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !'असा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांना सुनावलं.

सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Angry on Bhaiyyaji Joshi
Nilesh Deshmukh Attack: धक्कादायक: मस्साजोग नंतर आता खामगाव! आणखी एका देशमुख सरपंचावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? असा सवाल राज यांनी जोशींना केला आहे.

नेमकं काय म्हणाले भैय्याजी जोशी?

मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com