Ajit Pawar, Ranjit Taware Sarkarnama
पुणे

Ranjit Taware: जिल्हा बँकेच्या संचालकपदी अजितदादांचे निकटवर्तीय रणजीत तावरे यांची निवड

Pune District Co-operative Bank : रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने माळेगावात युवकांनी एकच जल्लोष केला.

Mangesh Mahale

Malegaon :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालक काेण होणार, या चर्चवर आता पडदा पडला आहे. अजितदादांचे निकटवर्तीय रणजीत अशोकराव तावरे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने माळेगावात युवकांनी एकच जल्लोष केला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल, याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

या निवड प्रक्रियेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा अनेक दिवस चालू होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी इच्छुक असलेले बारामतीतील मदनराव देवकाते यांचेही नाव घेतले जात होते. परंतु ही  राजकीय पार्श्वभूमी विचारात न घेता अजित पवार यांनी तावरे कुटुंबीयांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले.

कोण आहेत रणजीत तावरे

नवनिर्वाचित संचालक रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. रणजीत तावरे हे माळेगाव येथील राजहंस सहकार संकुल या वित्तीय संस्थेचे कामकाज पाहात आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामात सक्रिय आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT