Mumbai Latest News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सुरू केलेली मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी या शाखेचे कार्यालय बुलडोझरने भुईसपाट करण्यात आले आहे. या घटनेनंतर ठाकरे गट संतप्त झाला आहे.
"शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल," असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे. "हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
"हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. 11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत. तुमच्या बुलडोझरपेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्त्वाचे..हिशोब होईल," असे राऊतांनी ठणकावून सांगितले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि मुंबई परिसरातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांत राडा होत आहे. ठाकरे गटाच्या शाखा ताब्यात घेण्यावरून मुंबईत सध्या दोन्ही गटांत वाद चिघळला आहे. मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे-शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. ही शाखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सुरू केली होती. आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील शाखांवर लक्ष केंद्रित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.