Mahadev Jankar
Mahadev Jankar  Sarkarnama
पुणे

Mahadev Jankar : ''...तर मला मंत्री करतील!''; मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवणाऱ्यांत जानकरही ?

सरकारनामा ब्यूरो

Mahadev Jankar On Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन सात आठ महिने पूर्ण होत आहे. मात्र,अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधारी भाजप व शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीकाही केली जात आहे. मात्र,तरीदेखील मंत्रिमंडळासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे.

शिंदे गट आणि भाजपमधील काही नेतेमंडळी मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारा(Cabinet Expansion)वरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची चर्चा देखील आहे. याचदरम्यान भाजपच्या मित्रपक्ष असणाऱ्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

रासपचे नेते महादेव जानकर(Mahadev Jankar) हे कसबा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते.यावेळी त्यांनी मंत्रिपदासह, भाजप युती, पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं. जानकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे असल्यापासून आमची भाजपसोबत युती आहे. मात्र, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही भाजपला साथ दिली. आमची ताकद फार मोठी नाही. पण तरीही आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी माझ्या टीमसह सहभागी झालो आहे.

राष्ट्रीय समाज पक्षा(Rashtriy Samaj Paksha)ला चार राज्यात आमचं काम असून तिथे चांगली मतं मिळाली आहे. आमचे चार आमदार आजपर्यंत निवडून आले आहेत. तसेच गुजरातला २८ नगरसेवक विजयी झाले आहेत. एक नगरसेवक बँगलोरला, एक जिल्हा परिषद सदस्य ओरिसाला आहेत. आणि उत्तर प्रदेशात ११० उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे आमची फार ताकद आहे असं मी म्हणत नाही. पण लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आमच्या पाठीशी जी काय ताकद आहे पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी वापरणार आहे असंही जानकर म्हणाले.

माझी भाजप(BJP)सोबत युती आहे. आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी मी इथे आलो आहे. मंत्रिपदासाठी नाही. भाजपाला गरज वाटली तर मला मंत्री करतील. नाही वाटली तर सोडून देतील असं असं सूचक विधान जानकर यांनी यावेळी केलं आहे. तसेच मी रिमांडर नाही तर कमांडरच्या भूमिकेत आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांना योग्य वाटलं तर चे माझा मंत्रिपदासाठी विचार करतीलच ना, पण नाही वाटलं तरी आपला मार्ग मोकळा आहेच असंही ते म्हणाले.

लोकसभेला उभं राहिलो असताना माझ्या पक्षाची काही ताकद नसतानाही रासने यांनी जीवाचं रान करत मला खडकवासल्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिलं होतं. त्याचीच जाणीव ठेवत आणि माझं कर्तव्य समजून कसब्यात हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा गुलाल उधळण्यासाठी रासपची सर्व ताकद पणाला लावणार आहे असंही जानकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT