Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
पुणे

Mahadev Jankar News: पवारांनी मोदींना फोन केल्यानेच २०१४ मध्ये माझा पराभव ; जानकरांचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे जाहीर केले. नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. पवारांच्या या निर्णयाचा सर्वांना मोठा धक्का बसला आहे .

‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करून जोरदार घोषणाबाजी केली. साहेब निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणार नसल्याची भूमिकाही जाहीर केली.

पवारांच्या निर्णयावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पवारांच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

बारामती लोकसभा मतदार संघामधून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षांचे अध्यक्ष महादेव जानकर रासपांच्या चिन्हावर भाजप- सेनेच्या पाठिब्यावर निवडणूक लढवली होती.

त्यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांचा ६९ हजार ६६६ मतांनी पराभव झाला. यावर जानकर यांनी हा खुलासा केला की पंतप्रधान मोदींना शरद पवारांनी फोन करून माझ्या खासदाराचा पाठिबा तुम्हाला देतो पण तुम्ही सभेला येऊ नका, असं सांगितल्याने मोदी साहेब आले नाहीत," असा आरोप जानकरांनी केला .

"शरद पवारांच्या एका फोनमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती येथे माझ्या सन २०१४ लोकसभा निवडणूक प्रचारार्थ होणारी सभा रद्द केल्यामुळेच माझा विजय थोडक्यात हुकला," असे महादेव जानकर म्हणाले.

"बारामती, परभणी, म्हाडा यांच बरोबर उत्तरप्रदेश ( मुज्जफरपुर ) असे लोकसभेला माझ्या समोर चार पर्याय असून या पैकी मी कोठुनही निवडणुकीला उभा राहु शकतो. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोबत घेतले तर ठिक अन्यथा इतर पर्याय पक्षाला आहेत, असे सांगत जानकरांनी स्वबळाचा नारा दिला .

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT