Pune Political News : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर आमदार रवींद्र धंगेकरांनी शहरातील अवैध पब आणि ड्रग्जच्या मुद्यावरुन रान पेटवले आहे. त्यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सोमवारी (ता. 27) शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना धारेवर धरले. यावेळी धंगेकरांनी अधीक्षक राजपूतांसह इतर अधिकाऱ्यांची लाज काढत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
आमदार धंगेकर Ravindra Dhangekar यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर लाखो रुपये हप्ते घेत असल्याचा आरोप केले. ते म्हणाले, तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का? तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलं. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, असे एकापाठोपाठ एक असे प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी हप्ते घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांची थेट नावांची यादीच वाचून दाखवली.
कॉन्स्टेबल सागर सुर्वे, समीर पडवळ, तात्या शिंदे, स्वप्नील दरेकर, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, अधीक्षक चरणसिंह राजपूत हे तुमच्या आशिवार्दाने हप्ते घेतात असा आरोप यावेळी धंगेकरांनी केला. यासह काही खासगी व्यक्ती देखील वसुलीचे काम करतात असेही धंगेकरांनी आरोप केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे महानगरपालिकेची PMC परवानगी नसेल तर तुम्ही एक पत्रा देखील टाकू शकत नाही, मग शहरातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? असा जाब धंगेकरांनी विचारत उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगत असून यापुढे तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही धंगेकरांनी दिला.
खोट्या नोटांचा बॉक्स भेट
उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी हप्ते घेऊन रात्रभर शहरातील पब, बार यांना उघडे ठेवण्यास परवानगी देतात, असा आरोप धंगेकरांनी केला. अधिकाऱ्यांच्या या हप्तेवसुलीचा धगेंकरांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खोट्या नोटा भरलेला मोठा बॉक्स भेट म्हणून दिला. तर सुषमा अंधारेंनी Sushma Andhare उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंना खडेबोल सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.