Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपनेत्यांवर सुरू केलेली टीकेची जोड काही दिवसांसाठी थांबवली होती. मात्र, काल त्यांनी मुंबई दौरा केला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) मुंबईमधून कोणता संदेश मिळालाय का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर तीव्र टीका केली होती. त्यामुळे पुण्यातील महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः हस्तक्षेप करून धंगेकर यांना महायुतीत दंगे नकोत, असे स्पष्ट संकेत दिले होते. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील आरोप थांबवले आणि “आता मी नाव घेणार नाही,” असे जाहीर केले होते.
परंतु, मुंबईहून परतल्यानंतर धंगेकर यांनी पुन्हा मोहोळ यांना लक्ष्य करीत गंभीर आरोप लावले. पौडफाटा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहोळ यांच्या गुंडाने हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. मोहोळ यांनी अल्पसंख्यांक मोर्च्यात सरचिटणीसपदी नेमलेल्या रफिक शेख या व्यक्तीने पिस्तूल दाखवत zzzzzसाथीदारांसह मेगा सिटी वस्तीत घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण आणि वस्तीतील महिलांवर हल्ला केल्याचे धंगेकर म्हणाले.
सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो बाकी; गुन्हेगारीची मुळे याच ठिकाणी,” अशा शब्दांत त्यांनी मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.याशिवाय, रफिक शेख या व्यक्तीने वस्तीतील महिलांना मारहाण केल्याचे धंगेकर यांनी सांगितले. हा रफिक भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा सरचिटणीस असून, त्याच्या अभिनंदनाचा फोटो आणि पत्रही त्यांनी शेअर केले. कोथरूडमध्ये रफिक काही बिल्डरांसोबत काम करतो, अशी माहितीही धंगेकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून धंगेकर मोहोळ यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारात मोहोळ यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप त्यांनी आधी केला होता. गोखले बिल्डरशी मोहोळ यांचे हितसंबंध असून, मंत्रिपदाचा दुरुपयोग गोखले यांच्या फायद्यासाठी केल्याचा दावाही त्यांनी केला.
महापौर असताना मोहोळ यांनी बढेकर बिल्डरची गाडी अधिकृत वाहन म्हणून वापरल्याचा आरोपही धंगेकर यांनी लावला होता. आता गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा आरोप करीत धंगेकर यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.