Duplicate Voter Controversy : दुबार मतदारांचा वाद आता थेट पोलीस ठाण्यात, राऊतांची आशिष शेलारांच्या विरोधात तक्रार

Duplicate voter list Maharashtra : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात दुबार मतदारांवरून सुरू झालेला वाद आता हिंदी आणि मुस्लिम धर्मावर येऊन ठेपला आहे. मविआच्या आंदोलनात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांची नावे वाचून दाखवली होती. त्यावर आशिष शेलार यांनी ठाकरेंना फक्त हिंदूचीच नावे दिसली मुस्लिमांची का नाही? असा सवाल केला होता.
Nitin Raut, Ashish Shelar
Congress leader Nitin Raut addressing media after filing a complaint against BJP leader Ashish Shelar in Nagpur, amid growing tensions over duplicate voter lists and communal allegations.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 05 Nov : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात दुबार मतदारांवरून सुरू झालेला वाद आता हिंदी आणि मुस्लिम धर्मावर येऊन ठेपला आहे. आघाडीच्या आंदोलनात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दुबार मतदारांची नावे वाचून दाखवली होती.

त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंना फक्त हिंदूचीच नावे दिसली मुस्लिमांची का नाही? असा सवाल उपस्थित केला होता. सोबतच दुबार नावे असलेल्या काही हजार मुस्लिम मतदारांचा आकडाच त्यांनी जाहीर केला होता.

याविरोधात काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पुन्हा एकदा मुस्लिम-हिंदू असा वाद निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा मांडला होता.

Nitin Raut, Ashish Shelar
Mahayuti Alliance : बुलढाण्यात महायुती फूटली, शिंदेच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने धुडकावली

भाजपने महाराष्ट्राची विधानसभा चोरल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तेव्हापासून इव्हीएम आणि मतदार याद्यांवर शंका व्यक्त केली जात आहे. यात आता ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंचया मनसेनेही या आरोपांना सहमती दर्शवत आंदोलनात पुढाकार घेतला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदारांना बडवून काढण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिलेत.

Nitin Raut, Ashish Shelar
Kolhapur Sugarcane Protest : कोल्हापुरात संतप्त शेतकऱ्यांकडून CM फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न, ऊस आंदोलन पेटणार

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही दुबार मतदारांची नावांचे वाचन केले. हीच नावे हेरून आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांची नावे घेताना एकाही मुस्लिम मतदाराचा उल्लेख केला नाही. त्यांना फक्त मराठी म हिंदू माणूसच दिसला का असा सवाल करून ठाकरे बंधूच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले.

त्यावर काँग्रेसने भाजपला मतदारांच्या नावांमध्येसुद्धा हिंदू, मुस्लिम भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. आता नितीन राऊत यांनी शेलारांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याने स्थानिक निवडणुकीत सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी प्रचाराची लाइन आखल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेलार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागपूरचाही उल्लेख केला होता. यात त्यांनी ८३३२ दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा केला होता. या विरोधात राऊत तक्रार करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com