Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : सरकार 'लाडक्या बहि‍णीं'ची फसवणूक करणार; रवींद्र धंगेकर संतप्त

Ladki Bahin Yojana : राज्यातील विरोधी पक्षांतील आमदारांना निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

सागर आव्हाड

Pune Political News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे.

मात्र या योजनेतून सरकार राज्यातील लाडक्या बहि‍णींची फसवणूक करणार असल्याची टीका आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच आमदार निधी या योजनेसाठी वळवल्याने धंगेकरांना संताप अनावर झाला आहे.

सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधक करत आहेत. तिजोरीत पैसे नसतानाही लाडकी बहीण योजना रेटली जात आहे, असा आरोप होत आहे.

त्यामुळे ही योजना फक्त निवडणूक होईपर्यंत असणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र 10 वेळा अर्थसंकल्प मांडल्याने या योजनेसाठी कुठून निधी उभा करायचा हे माहीत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Ajit Pawar विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत.

आता राज्याभर सर्व पक्षांनी आपल्या यात्रा सुरू केल्या आहेत. महायुतीतील पक्ष लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहेत. मात्र ही योजनाच फसवी असल्याचे हल्लाबोल आमदार धंगेकरांनी Ravindra Dhangekar केला आहे.

ते म्हणाले, राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू केली आहे. त्यासाठी सन्मान यात्राही सुरू झाल्या आहेत. मात्र लाडकी बहीण योजना ही फक्त दोन महिने चालणार आहे. त्यामुळे राज्य सरकार हे बहिणींची फसवणूक करत असल्याची टीका आमदार रवींद्र धंगेकरांनी केली.

लाडकी बहीण योजनेसाठी आमदार निधीचे पैसे व इतर महामंडळाचे पैसेही वापरले जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. आमदार निधीचे पैसे मिळणार नसतील तर मतदारसंघात कामे कशी करायची, असा प्रश्न धंगेकारांनी उपस्थित केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT