Video Supriya Sule : तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते! सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम

Maharashtra Mahayuti Govt : आता ही योजना कायम करण्यासाठी पुन्हा महायुतीचे सराकर हवे, अशी विधाने सत्ताधारी मंडळी करत आहेत.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले.

आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर आमदार राणांना थेट दम भरला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या योजनेवरून आता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर राज्य सरकराने अंतरिम अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस पाडल्याची टीका झाली. त्यातील लाडकी बहीण योजना ही राज्यातील लोकांनी उचलून धरल्याचे चित्र आहे. आता ही योजना कायम करण्यासाठी पुन्हा महायुतीचे सराकर हवे, अशी विधाने सत्ताधारी मंडळी करत आहेत.

त्यातूनच आमदार रवी राणा Ravi Rana यांनी, विधानसभेत महिलांनी महायुतीला मतरुपी अशीर्वाद देण्याचे आवाहन केले. तसेच मत दिले नाही तर लाडकी बहीण योजनेतून दिलेले 1500 हजार रुपये काढून घेतले जातील, असेही त्यांनी विधान केले. या विधानावरून मात्र राज्यात आता राळ उठली आहे.

Supriya Sule
Ajit Pawar : 'सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं'; अजितदादांना मोठी खंत

राणा यांच्या या विधानावर सुप्रिया सुळे Supriya Sule संतप्त झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, राज्यातील बहि‍णींची ताकद 1500 रुपये परत घेणाऱ्या भावाला समजेल. या महाराष्ट्रातील लेक, तिला अशा धमक्या दिल्या तर चालणार नाहीत. तू पैसे परत घेऊनच दाखव मग बघते तुझा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते, असा दमच सुळेंनी राणांना भरला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते यांनी राणांच्या या विधानावरून थेट महायुती सरकारवरच हल्लाबोल केला आहे. राणा जे काही बोलले ते महायुती सरकारधील नेत्यांच्या मनातील बोलले आहेत. मात्र हे पैसे लोकांच्या करातून जमा झालेले आहेत. ते परत घेण्यासाठी कुणाच्याही खिशातून आले नाहीत, असा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले होते.

Supriya Sule
Aaditya Thackeray : अरविंद सावंतांना वरळीतून कमी मताधिक्य, आदित्य ठाकरे म्हणतात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com