Ravindra Dhangekar responds to social media controversy, clarifying the truth behind his son’s viral photo.  sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : 'तो माझा पोरगा आहे, बंदुकीनीच खेळणार ना', रवींद्र धंगेकरांनी 'त्या' फोटोंबाबत स्पष्ट सांगितलं, भाजपवरही निशाणा

Ravindra Dhangekar VS BJP : रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुलाच्या हातात बंदूक होती. त्यावर धंगेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Roshan More

Pune News : शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हे कोथरूड मधील गुन्हेगारीच्या अनुषंगाने सातत्याने भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. अशातच धंगेकर यांच्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये रवींद्र धंगेकर यांचा मुलगा गुंड गजा मारणे याच्या सोबत दिसला तर दुसऱ्या एका फोटोमध्ये धंगेकरांच्या चिरंजीवांनी बंदूक हातात घेतल्याचं दिसत होतं. या फोटोंबाबत आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धंगेकर म्हणाले, कुख्यात गुंड निलेश घायवळ याबाबत बोलायला लागल्यानंतर भाजपकडून आपल्या कुटुंबाला लक्ष करण्यात येत आहे. भाजपच्या सोशल मीडिया टीम कडून माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. माझ्या 21 वर्षाच्या मुलाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत.भाजपने हे राजकारण खालच्या पातळीवर नेलं असून कौटुंबिक हल्ले सुरू झाले आहेत.

मुलाच्या व्हायरल झालेल्या फोटो बाबत बोलताना धंगेकर म्हणाले, माझा मुलगा 21 वर्षाचा आहे आणि जो गजा मारणे सोबत त्याचा फोटो आहे. तो दोन वर्षांपूर्वीचा असून तेव्हा तो कॉलेजमध्ये होता. तो एका गणपतीला गेला असताना त्या ठिकाणी मारणे भेटला आणि त्यांनी तो फोटो काढला होता.

दुसरा जो फोटो व्हायरल करण्यात येत आहे. त्या फोटोमध्ये माझ्या मुलाच्या हातात असलेली बंदूक ही खेळण्याची बंदुक आहे. तो धंगेकरांचा मुलगा आहे त्याने चमचा लिंबूनि खेळायचं का तो बंदुकीने खेळणारच ना ? आणि ती खेळण्याची बंदूक आहे. पाहिजे असेल तर मी दाखवतो माझ्या घरात आता ही दोन-तीन बंदूक आहेत ज्या फुगे फोडायच्या असतात असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिली.

माझ्यावर मकको लावण्याचा प्लॅन

माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची देखील षडयंत्र आखल जात आहेत. चार-पाच गुन्हे दाखल करून माझ्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आहे. तसेच मला तडीपार देखील करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील हे समीर पाटील यांच्यामार्फत हे करत असल्याचा देखील गौप्यस्फोट धंगेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT