Nashik Prakash Londhe : चावी फिरवताच उघडला गुप्त दरवाजा, लोंढेच्या कार्यालयातील भुयारात काय काय सापडलं?

Prakash Londhe secret tunnel : प्रकाश लोंढे याने सुरुवातीला फर्निचरच्या मागे कोणताही चोर दरवाजा नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी ठणकावून सांगताच लोंढेने फर्निचरच्या गुप्त ठिकाणी चावी फिरवली.
Prakash Londhe Case
Prakash Londhe Casesarkarnama
Published on
Updated on

Prakash Londhe Case Nashik : नाशिकच्या सातपूर येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा मुख्य आरोपी आरपीआय जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या कार्यालयात भुयार सापडल्याने खळबळ उडाली आहे. या भुयाराचा वापर लोंढे गुन्हेगारीसाठी करत असल्याचे देखील समोर आले आहे.

सातपूर येथे आयटीआय पुलाजवळ प्रकाश लोंढे याचे धम्मतीर्थ कार्यालय आहे. या कार्यालयाची पोलिसांनी रविवारी झडती घेतली. सातपूर पोलिस प्रकाश लोंढे यांना घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयात फर्निचरचे शोकेस बनविण्यात आलेले होते. मात्र त्यातील एका शोकेसला गुप्त दरवाजा होता आणि पोलिसांच्या ते लक्षात आलं. पोलिसांनी लोंढेला तो दरवाजा उघडण्यास सांगितले पण तसा कोणताही चोर दरवाजा नाही असं लोढें म्हणाला. पण पोलिसांनी त्याला ठणकावून सांगितले म्हणाले आम्हाला माहित आहे उघडा...

मग भुयार नसल्याचे म्हणणाऱ्या लोंढेनेच एका शोकेसमधून चावी काढली आणि दुसऱ्या शोकेशमध्ये गुप्त ठिकाणी ती चावी लावली असता पार्टीशन उघडलं. तो दरवाजा उघडताच भुयारात जाण्याचा मार्ग सापडला. यावेळी पोलिसही चकीत झाले, त्यांचेही डोके चक्रावले. एखाद्या चित्रपटात बघावा असाच काहीसा तो सीन होता. मग लोंढे स्वत:खाली भुयारात पोलिसांना घेऊन गेला. (Nashik Crime)

Prakash Londhe Case
Nashik Crime : भाजप नेते सुनिल बागुलांचे तीनही पुतणे अखेर 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात', पोलिसांनी दाखवला खाक्या

भुयारात पोलिसांना काय काय सापडलं?

या भुयारात दोन बेडरूम तयार करण्यात आलेले होते. या ठिकाणी कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे अशी घातक हत्यारे सापडली. तसेच महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्याही पोलिसांच्या हाती लागल्या आहे. एकूण २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Prakash Londhe Case
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालये होणार समृद्ध!

लोंढेच्या या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी त्याचा डीव्हीआर जप्त केला आहे. त्यातून या लोढेंच्या कार्यालयात कोण कोण येत होतं हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही संशयित पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com