Hemant Rasane, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Kasba By Election : भाजप ठरलं कसब्यातून रासनेंना उमेदवारी; धंगेकरांच्या नावाची फक्त औपचारीकताच बाकी?

Hemant Rasane, Ravindra Dhangekar News : काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Kasba By Election : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली आहे. येथे भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरु आहे.

मात्र, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छुक असले तरी माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. त्यामुळे कसब्यामध्ये हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांच्यातच सामना होण्याची शक्यता आहे.

भाजपाकडून (BJP) सुरवातीपासून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता धंगेकर यांच्या नावाची फक्त औपचारीकताच बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसची आहे. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी १६ जणांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या होत्या. यात अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगिता तिवारी, विजय तिकोणे व इतर इच्छुकांचा समावेश होता.

काँग्रेसने धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यास या मतदार संघात, चांगली लढत होईल, असे सांगितले जात आहे. तसेच आघाडी व्यवस्थीत पणे एकत्र लढली तर भाजपसमोर आव्हान निर्माण होऊ शकते. यासाठी आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT