Kasaba By-Election : कसब्यात डझनांनी इच्छुक; पण लढत रासने-धंगेकरांच्यातच होण्याची शक्यता

Hemant Rasane vs Ravindra Dhandekar : कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वपक्षांतून इच्छुकांचा रांगा
Ravindra Dhangekar, Hemant Rasane
Ravindra Dhangekar, Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Hemant Rasane vs Ravindra Dhandekar : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी सर्व पक्षातील नेत्यांसह कार्यकर्तेही इच्छुक आहेत. सर्वच पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba by-election) काँग्रेसकडून सोळा तर राष्ट्रवादीकडून बाराजण इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेनेदेखील निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत अनेक पक्ष आणि इच्छुक असले तरी खरी लढत भाजपाचे हेमंत रासने व काँग्रेसकडून माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यात होण्याची शक्यता अधिक असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Ravindra Dhangekar, Hemant Rasane
Satyajit Tambe News : राज्यात पुन्हा भूकंप होणार...सत्यजीत तांबे लवकरच घेणार मोठा निर्णय

भाजपाकडून (BJP) सुरवातीपासून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, माजी नगरसेवक हेमंत रासने (Hemant Rasane), धीरज घाटे व गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, धंगेकर यांच्यासमोर निवडून येण्यासाठी पक्षाकडून टिळक कुटुंबाशिवाय अन्य नावाचा विचार करण्यात येत आहे.

त्यात रासने यांचे नाव प्राधान्याने आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाकडून सर्व्हे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी पक्षाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत प्रामुख्याने शैलेश टिळक (Shailesh Tilak) व रासने या दोघांच्यात नावावर भर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ravindra Dhangekar, Hemant Rasane
Devendra Fadnavis : पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांची फिल्डिंग; अनेक योजना मार्गी

कसब्यातून निवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा कोणताही निर्णय अद्याप झाला नाही. मात्र, काँग्रेसमधून या ठिकाणी अनेकजण इच्छुक आहेत. या निवडणुकीसाठी पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी १६ जणांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या. यात अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगिता तिवारी, विजय तिकोणे व इतर इच्छुकांचा समावेश आहे.

Ravindra Dhangekar, Hemant Rasane
State Song News : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताला का मिळाला राज्यगीताचा दर्जा? कुणी लिहिले हे गीत..

राष्ट्रवादीतूनही (NCP) कसब्यातून लढण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत काही इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे (Ankush Kakde), अण्णा थोरात, रविंद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombre), शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण १२ इच्छुकांची नावे समोर आली आहेत.

पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांनीही शड्डू ठोकले आहेत. याबाबत ठाकरे गटाची पुण्यात बैठकही झाली आहे. इच्छुक उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना पाठवण्यात आली आहेत.

शिवसेनेपाठोपाठ मनसेच्या (MNS) पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत अनिल शिदोरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहेत. यानंतर तीन फेब्रुवारी रोजी राज ठाकरे (Raj Thakare) आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com