Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Victory: भाजपनं कसबा गड गमावला; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला बालेकिल्ल्यातच मोठे खिंडार पडले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची विजय खेचून आणला आहे. विसाव्या फेरीअखेर ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा धक्कादायक पराभव केला आहे.

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा दणदणीत पराभव केला आहे.मात्र, आता पोटनिवडणुकीत पारंपरिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांनीच भाजपचं टेन्शन वाढवलं. धंगेकर यांना ७३ हजार २८३ तर रासने यांना ६२ हजार २४४ मतं पडली.

अठराव्या फेरी अखेर ६७९५३ तर रासने यांना ५८९०४ मतं पडली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्याकडे निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.मात्र, तरीदेखील भाजपचा बालेकिल्ला वा पारंपारिक मतदारसंघ राहिलेल्या पेठांमधील लोकांनी यो पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंऐवजी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याच पाठीशी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीत आघाडी राखली. ती सातत्याने कमी अधिक प्रमाणात राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपचा प्रभाव असलेल्या पेठांमधील फेरीत रासने ही पिछाडी भरुन काढतील असा अंदाज होता. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याचं समोर येत आहे. त्यामुळे धंगेकर यांनी दहाव्या फेरीअखेर तेरावी फेरीअखेर ५ हजारांवर मतांनी आघाडीवर होते. अठराव्या फेरीअखेरही धंगेकर आघाडीवरच होते.

तेराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना ४९ हजार १२० तर हेमंत रासने यांना ४४.३४ मतं पडली आहेत. तर हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना १२१ मते पडली आहेत.

कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ४५०६ मतांची आघाडी घेतली आहे. यात धंगेकर यांना ३४ हजार ७७८ मतं पडली आहेत. तर हेमंत रासने यांना ३० हजार २७२ मतं पडली आहेत.

आठव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ३५०० मतांची आघाडी घेतली होती. आठव्या फेरीअखेर धंगेकर यांना ३० हजार ५२७ तर रासने यांना २७ हजार १८७ मतं पडली होती.

पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी चौथ्या फेरीत आघाडी घेतली होती. मात्र, पाचव्या आणि सहाव्या फेरीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार मुसंडी मारताना पुन्हा एकदा आघाडी घेतली होती.

सहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना १९ हजार ६४५ तर हेमंत रासने यांना १६ हजार ४२३ मतं पडली आहेत. यात धंगेकर यांनी ३ हजार २२२ मतांनी आघाडी घेतली आहे. तर हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना १०० मतं तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना ४ मतं पडली आहे.

तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ११,७६१ मतं तर हेमंत रासने यांना १०,६७३ मतं पडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT