Kasba Peth Bypoll Election Result : निकालापूर्वीच धंगेकरांना अजितदादा, पटोलेंचा फोन ; कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण..

Kasba Peth Bypoll Election Result : धंगेकर १८ व्या फेरी अखेर ९ हजार मतांनी आघाडीवर आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama

Kasba Peth Bypoll Election Result : कसबा पेठ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १८ व्या फेरी अखेर ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. निकालापूर्वीच धंगेकरांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरवात केली आहे. कसबा पेठेत धंगेकरांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत आहेत .

Ravindra Dhangekar
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

सोळाव्या फेरी अखेर घेतलेली आघाडीनंतर धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अभिनंदनाचा फोन आला असल्याचे धंगेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. "जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याची ही पावती आहे,' असे धंगेकर म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारात भाजपविरोधी वातावरण दिसल्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला. "कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची करुन ठेवली. त्यामुळे यातील एक जरी जागा महाविकास आघाडीला मिळाली तर हा भाजपसाठी मोठा धक्का असेल," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Ravindra Dhangekar
Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचं लीड वाढलं..

कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना केवळ ४ मते मिळाले आहेत. पुणेकरांनी या दोघांना नाकारलं आहे.

चिंचवडमध्ये नवव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी 32288 मतांनी आघाडी मिळवली आहे. तर, मविआचे नाना काटे यांना 25922, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 10705 मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com