Pune News, 22 Feb : विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्तच असल्याचे पाहायला मिळत आहे. धंगेकरांनी दरम्यानच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने ते लवकरच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे.
अशातच आता धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) ठेवलेलं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत आहे. या स्टेटसच्या माध्यमातून धंगेकरांनी पक्ष प्रवेशाबाबत संकेत दिलं आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना डावलल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर धंगेकरांनी स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स ठेवले आहे.
ज्यामध्ये गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो वापरत, 'तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी. तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही...' हे गाणं त्याला जोडलं आहे. त्यामुळे धंगेकरांनी पक्षांतराचा विचार पक्का केलाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्या पद्धतीने राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील शिंदेसेनेकडून (Shivsena) मिशन पुणे राबविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मिशन पुणे अंतर्गत पुढील काही दिवसांत एक मोठा प्रवेश पुण्यात होणार असल्याचा दावा शिंदेसेनेचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे हा प्रवेश रवींद्र धंगेकर यांचा तर नाही ना? याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.
कारण काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांच्या शिंदेसेनेमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केलं असलं तरी सध्या त्यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.