Ravindra Dhangekar  Sarkarnama
पुणे

Pune News : धंगेकरांना खासदारकीची 'हसीन सपने' पडतात; पुणे भाजपचा पलटवार

Ravindra Dhangekar vs Dheeraj Ghate : भाजप आणि काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये टोकाच्या आरोप- प्रत्यारोप सत्राला सुरुवात.

Sudesh Mitkar

Pune news: लोकसभा निवडणूक जशी जवळ येत चालली आहे, तसं भाजप आणि काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शांत अशी ओळख असलेल्या कोथरुड भागात गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून होतो. ही बाब दुर्दैवी असून कोथरुडची ओळख बदलत आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने अनेक गुंडांना आश्रय दिल्याचा गंभीर आरोपही धंगेकरांनी केला आहे. आता या आरोपांना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उत्तर दिले आहे.

धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालिन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करावी, यासह इतर काही मागण्या त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या. यावेळी धंगेकर यांनी 'शरद मोहोळचा भरदिवसा कोथरुड भागात खून झाला. वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरुडची ‘अशांत कोथरुड’ अशी ओळख निर्माण झाली असल्याची टीका केली. मी केलेली टीका भाजपला चांगलीच लागली, त्यामुळे लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेत भाजपने धंगेकर यांना उत्तर दिलं आहे.

मुंगेरीलाल के हसीन सपने

धीरज घाटे म्हणाले, 'काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत. त्यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं वाटत असून आपण पुण्याचे खासदार होणार आहोत, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे कसब्यातील नागरिकांच्या समस्या सोडून त्यांना कोथरूडमधील नागरिकांची काळजी वाटू लागली असल्याची टीका घाटे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा

घाटे म्हणाले की 'धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. गुन्हेगारीमुक्त भयमुक्त वातावरण यासाठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारीमुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. गृह खाते मोहोळ यांच्या विषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल, परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करीत असतात.

ते हवेने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल. त्यांना 'मुंगेरीलाल के हसीन सपने' पडत आहेत. ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला. दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघातल्या जनतेची काळजी नाही, त्यांनी कोथरूडची काळजी करावी, हे खरोखर हास्यास्पद आहे. स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे, की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजिल आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांतदादा हे गेल्या साडेचार वर्षांत मोहोळ यांना भेटलेदेखील नाहीत, असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही.'

R...

SCROLL FOR NEXT