Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपकडून टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. शैलेश टिळकांनी देखील रासनेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जाहाीर नाराजी व्यक्त केली होती. आता याचवेळी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठं विधान केलं आहे.
भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात कसबा पोटनिवडणुकीतच थेट लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पुण्यात दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. भाजपच्या रासनें पाठोपाठ काँग्रेसच्या धंगेकर यांनी देखील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळकांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मुक्ता टिळकांना अभिवादन केले.
यानंतर त्यांनी मुक्ताताईंचं स्वप्नं भाजप नाही तर काँग्रेस पूर्ण करणार आहे असं विधान करत रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
धंगेकर काय म्हणाले?
मागील 30 वर्षांपासून मी समाजाचं काम करत आलो आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी काम केलं आहे. जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे. मी सर्वांना न्याय देण्याचं काम करतो आणि ही माझी राजकीय जीवनात जमेची बाजू आहे. पुणेकरांना माझं काम माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या जिवावर मी नक्की निवडून येईल असा आत्मविश्वासही धंगेकरांनी व्यक्त केला आहे.
रासनेंचाही विजयाचा दावा...
भाजप उमेदवार हेमंत रासने म्हणाले, मी भाजपच्या कुटुंबातील एक घटक आहे. आणि भारतीय जनता पार्टीं जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या ३० वर्षापासून पक्षाचा एक शिस्तबध्द कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडली आहे.
विरोधक असतातच. मला कुणाच्या नावाविषयी काहीही म्हणायचं नाही. विरोधी उमेदवाराविषयी मला आदरच आहे. पण भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम आणि हजारो गणेश मंडळासह पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढविणार आहे. आणि विक्रमी मताधिक्यानं ही निवडणुक जिंकेल असा आत्मविश्वासही हेंमत रासने यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.