Waduj News : सर्वसामान्य माणसाला सत्तेमध्ये संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली आहे. आता देशांतील चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची (Rashtriya Samaj Paksha) चांगली वाढ झाली आहे. कार्यकर्त्यांनी सकारात्मक विचाराने काम करून पक्ष वाढवावा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक येथे झाली. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सरगर, उपाध्यक्ष बबन विरकर, रासपचे नेते मामूशेठ विरकर, खंडेराव सरक, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, पूजा घाडगे, उमेश चव्हाण, दादासाहेब दोरगे, विलास चव्हाण,डॉ रमाकांत साठे, आकाश विरकर, नितीन कटरे, सुरेखाताई काळेल, दत्ता खांडेकर, निलेश लांडगे, अतुल पवार उपस्थित होते.
महादेव जानकर म्हणाले, १९८४ साली भाजपचे दोन खासदार होते. पक्षाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ग्रामपंचायत ते देशपातळीवर विजय मिळविला आहे. २८८ पैकी बऱ्याच मतदारसंघात कमी मतांनी आमदार विजयी झाले आहेत. त्या ठिकाणी जर आपण निवडणूक लढवली तर आपली ताकद कळून येणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये पक्षाची ताकद वाढली पाहिजे.
समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत. राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून कार्यकर्त्यांना खूप मोठे काम करण्याची संधी आहे. मंत्री असताना येथील पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी मोठा निधी दिला आहे. दुधाचे दर वाढवून दिले. हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी गावोगावी व घरोघरी जनसंपर्क मोहिम राबविली पाहिजे. आपल्याला फक्त निवडणुका लढायच्या नाही तर त्या जिंकायच्या आहेत. पक्ष सर्वसमावेशक करण्यासाठी उपेक्षित समाजालाही संधी दिली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.