Pune News: यंदा महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक नवख्या नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रील्स बनवले असल्याचा समोर आलं होतं. आता या नवख्या रियल स्टार नगरसेवकांना माजी महापौर संघटनेच्यावतीने महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. याबाबत माजी महापौर संघटनेकडून महापौर मंजुषा नागपुरे यांना पत्र देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नवख्या रीलस्टार नगरसेवकांना पुढील काळात आळा घालण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे महापालिकेच्या पहिल्या सभेत अनेक कार्यकर्ते सभागृहात रिल्स काढत होते. या घटनेचा निषेध करत आता पुणे शहर माजी महापौर संघटनेने नागपुरे यांना पत्र पाठवले आहे. पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपण पहिल्या महापौर आहात. पुणे महानगरपालिका सभागृहाच्या कामकाजाचा आपणांस दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आपण सभागृहाचे कामकाज निश्चितच उत्तमपणे कराल असा मला विश्वास आहे.
मात्र, महापौर निवडणुकीचे वेळी सभागृहात अनेक कार्यकर्ते अनधिकृतपणे रिल्स बनवत होते. पहिल्या सभेमध्ये हे ठीक आहे, पण आता मात्र सभागृहात असे काही होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तसेच सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवावी.
सन २०१७-२२ या काळात सभा प्रश्नोत्तरांचा तास कधीही झाला नाही. आपल्या कारकीर्दीत तसे होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. तसेच Point of informationला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ देऊ नये. असा सल्लाही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.