Dilip Mohite Patil , Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Dilip Mohite Patil On Ajit Pawar : अजितदादांबाबत आमदार मोहितेंचा २४ तासांत 'यू टर्न'; शपथविधीला हजर आणि आता म्हणाले...

NCP Political News : पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपबरोबर जाण्यास पवारसाहेबांनी सांगितलं होतं...

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (ता.२) बंड केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे खेडचे पक्षाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. मात्र, त्यावरून त्यांनी २४ तासात यू टर्न घेतला. कार्यकर्ते आणि खेडच्या जनतेशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सोमवारी(दि.३) सांगितले. प्रसंगी राजकारणातून बाजूला होईल,पण जनतेशी प्रतारणा करणार नाही असेही मोहिते यावेळी म्हणाले.

मुंबईहून मतदारसंघात परतताच पूर्णपणे यू टर्न घेताना शरद पवारच नाही,तर अजितदादांवरही आमदार दिलीप मोहितें(Dilip Mohite Patil)नी खळबळजनक आरोप केले. मी शंभर टक्के या दोघांबरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. कालच्या सत्तानाट्यामुळे खेड तालुक्याचेच नाही,तर माझाही सर्वबाजूंनी तोटा झाला असे ते म्हणाले. शपथविधी आहे,असे अजितदादांनी सांगितल्याने रविवारी (दि.२) मुंबईला गेलो. पण, पुढील प्रकाराची म्हणजे असा काही निर्णय घेणार आहे,याची कल्पना दिली नव्हती,असा सनसनाटी दावा त्यांनी केला.

मोहिते पाटील म्हणाले, भाजप शिवसेना युती सरकारमधील सहभागाविषयी विश्वासात घ्यायला हवे होते,चर्चा करायला पाहिजे होती. संपूर्ण पक्षच भाजप(BJP)बरोबर जातोय असाच समज झाला होता असे ते म्हणाले.जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड यांनाही यावेळी त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हे दोघे मंत्री असताना माझे एकही काम केले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर अडीच वर्षात एक सही केली नाही. खेड तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी शेवटपर्यंत दिली नाहीअसा घणाघाती आरोप त्यांनी केला.

२०१९ च्या अजित पवारां(Ajit Pawar)च्या पहाटेच्या शपथविधीवेळी साहेबांनीच (शरद पवार) आम्हाला (आमदार) भाजपबरोबर जाण्यास सांगितले होते,असे स्फोटक वक्तव्य आ.मोहितेंनी यावेळी केले. पण,नंतर त्यावरून त्यांनी यू टर्न घेतला आणि आम्हाला पहिल्यांदा अडचणीत आणले.त्यानंतर पक्षाध्यक्ष सोडत आहे असे सांगत अध्यक्ष या सुप्रिया सुळे असतील असे त्यांनी नुकतेच सांगितले.

नंतर त्यावरूनही त्यांनी यू टर्न घेत दुसऱ्यांदा अडचणीत आणलेअसे सनसनाटी वक्तव्य आमदार मोहितेंनी केले. राज्यमंत्री करतो असा शब्द अजितदादांनी देऊनही त्यांनी तो पाळला नाही असे सांगत या स्पष्ट बोलण्याच्या परिणामाची पर्वा करीत नाही असेही आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT