Pune News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट प्रकरणी पुणे पोलिसांनी अखेर तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वसंत रमेशराव खुळे (वय-३४, रा. रहाटी, जि. परभणी), जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), प्रदीप कणसे (रा. पुणे) अशी त्या तिघांची नावे आहेत.
चौकशी बोलावण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पुणे सायबर पोलिसांनी तिघांचे मोबाईल जप्त केले आहेत. तर याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विकास सावंत, जयंत पाटील, रंजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील या फेसबुक खात्यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. यानंतर तांत्रिक माहितीद्वारे रंजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील हे खाते सांभाळणाऱ्या संशयित लोकांचे मोबाईल नंबरची माहिती सायबर पोलिसांना काढली.
त्यास ताब्यात घेतल्यानंतर तो मानसिक रुग्ण असल्याचे आढळून आले होते. जयंत पाटीलला नोटीस देऊन जबाब नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर वसंत खुळे आणि प्रदीप कणसे या दोघांनाही सीआरपीसी प्रमाणे नोटीस देऊन त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, यांच्या पथकाने केली.
सोशल मीडियावर महिलांसंदर्भात बदनामीकारक, अश्लील लिहल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे कोणी कमेंट, बदनामीकारक मजूकर लिहत असेल तर तक्रारकरण्यासाठी महिलांनी पुढे यायला हवं. असं आवाहन गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.