Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना अटक

Lalit Patil Case Pune : देवकाते यांना ललित पाटीलकडून आर्थिक मदत केल्याचे तपासात आढळले आहे.
Drug Mafia Lalit Patil
Drug Mafia Lalit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. देवकाते यांना ललित पाटीलकडून आर्थिक मदत केल्याचे तपासात आढळले आहे.

काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालय येथील ड्रग्जबाबतचा चौकशी अहवाल सरकारला देण्यात आला होता. सरकारने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ.प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चौकशीत देवकाते हे दोषी आढळले. देवकाते यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता. त्याच्याकडून डॉ. देवकाते यांना आर्थिक मदत झाल्याचे तपासात आढळले आहे.

अहवालात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि अस्थिरोग विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण देवकाते दोषी आढळले. ठाकूर यांना तातडीने पदमुक्त करण्याचा आदेश राज्य सरकारने घेतला. देवकाते यांना निलंबित केले. ठाकूर यांच्या पदाची सूत्रे डॉ. व्ही. पी. काळे यांनी हाती घेतली.

Drug Mafia Lalit Patil
Thackeray Group News: ठाकरे गट-पोलिसांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर झटापट

काळे यांची याच पदावरून प्रशासकीय कारण दाखवून दहा महिन्यांपूर्वी मध्यावधी बदली केली होती. त्या निर्णयाविरोधात काळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली होती. त्यात काळे यांच्या बाजूने निकाल दिला. त्या निकालाला ठाकूर यांनी उच्च न्यायालयातही आव्हान दिले. तेथेही ठाकूर यांच्या विरोधात निकाल लागला.

या दरम्यान ललित पाटील प्रकरणात दोषी धरून ठाकूर यांना पदमुक्त केले.राज्य सरकारने महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी काळे यांची नियुक्ती केलेली नाही. मात्र त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे पदाची सूत्रे घेऊन वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com