Dhangar Reservation - Kishor Masal
Dhangar Reservation - Kishor Masal  Sarkarnama
पुणे

Dhangar Reservation News : धनगर आरक्षणावरून राष्ट्रवादीचे किशोर मासाळ आक्रमक; म्हणाले, "...तर आत्महत्या करणार!"

मिलिंद संगई : सरकारनामा

Baramati : मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर आता धनगर आरक्षणाची तीव्रता वाढू लागल्याने सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले गेले. मात्र, धनगर आरक्षणाबाबतीताल गुन्हे मागे का घेतले जात नाही, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकार धनगर समाजासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप मासाळ यांनी करत खळबळजनक विधान केलं आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे(NCP) प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित होऊन येत्या 20 सप्टेंबर रोजी खंबाटकी घाट अडविण्याचे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. मासाळ यांनी आज फेसबुक लाइव्ह करत प्रशासनासह राज्य सरकारलाही दोन दिवसांत धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे; अन्यथा खंबाटकी घाटातील रास्ता रोकोनंतर मी माझे जीवन संपविणार असल्याचा इशारा दिला आहे.

मासाळ काय म्हणाले...?

किशोर मासाळ म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला सातत्याने आरक्षणाची भूलथापा देत त्यांच्या भावनांशी खेळण्याचेच काम केले गेले, प्रत्यक्षात आरक्षण काही मिळालेच नाही, त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा राहिलेली नसून मी माझे जीवन संपविणार असल्याचे त्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये नमूद केले.

दोन दिवसांत धनगर आरक्षणाबाबत(Dhangar Reservation) योग्य तो निर्णय घेतला नाही, तर आपण आपले जीवन संपवू, त्याला राज्य सरकार व संबंधित यंत्रणा व नेते जबाबदार असतील, असेही त्यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत किशोर मासाळ...?

किशोर मासाळ हे बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी त्यांना नुकतेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. धनगर आरक्षणाच्या चळवळीत मासाळ कार्यरत असून, त्यांनी आता आरक्षणासाठी टोकाची भूमिका जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.

आत्महत्या करणार असा मेसेज किशोर मासाळ यांनी व्हायरल केल्यानंतर बारामतीतही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT