Ajit Pawar In Pusesavali: अजित पवारांनी दिली पुसेसावळीस भेट; म्हणाले, एकमेकांना आधार द्या, अशा गोष्टी परवडणार नाहीत...

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अचानक पुसेसावळीला भेट दिल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
DyCM Ajit Pawar In Pusesavali Villege
DyCM Ajit Pawar In Pusesavali Villegesarkarnama

Pusesavali News : राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुसेसावळीला भेट दिली. तसेच येथील नुकसानीची पाहणी केली. तसेच गावातील लोकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी अजित पवार म्हणाले, गावातील वातावरण चांगले राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना आधार द्यावा. या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत, असा सल्ला त्यांनी ग्रामस्थांना दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी आज अचानक खटाव तालुक्यातील पुसेसावळीला Pusesavali Villege भेट दिली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. मागील आठवड्यात या गावात दंगल झाली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अकरा जण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गावातील नुकसानीची पाहणी करून लाेकांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, गावात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. गावातील वातावरण चांगले राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना आधार द्यावा. या गोष्टी कोणालाही परवडणार नाहीत.

आपल्यात तशी पद्धत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना, बारा बुलतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तशाच पद्धतीने आपण पुढे गेले पाहिजे व तसेच वागलं पाहिजे, असा सल्ला दिला.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com